!! मी देवाचा व देव माझा !!
एकदा श्री वासुदेवानंद सरस्वती नदीमध्ये अंघोळ करीत होते.तेव्हा एक चिकित्सक माणसाने त्यांना विचारले कि,देव जर निर्गुण निराकार आहेत तर आपण रोज देवाच्या मूर्तीची पूजा का करतो ? आणि दुसरे म्हणजे आपण तर संन्याशी आहात.आपल्याला देवांच्या मूर्तीची आवश्यकता काय?श्री टेंबे स्वामींनी उत्तर दिले कि ,नित्य एकाग्र मनाने पूजा केल्यामुळे मी व मूर्ती एकरूप झालेलो आहोत.मी देवाच्या मूर्ती शिवाय राहू शकत नाही.व देवांची मूर्तीही बहुतेक माझ्याशिवाय राहणार नाही.जर तुम्हाला पाहिजे तर पलीकडे ठेवलेली मूर्ती घेऊन जा. त्या प्रमाणे श्री टेंबे स्वामींनी मूर्ती त्या माणसाचे हवाली केली व ते पुढे चालू लागले.तो माणूस हि त्याचे घरी जाऊ लागला.१ ते १ || मैल गेल्यावर त्या माणसाने मूर्तीकडे लक्ष दिले.तेव्हा मूर्ती तेथे नव्हती .मूर्ती गायब झाली होती. तो माणूस घाबरला व पळत पळत स्वामींकडे आला.व वरील घटना सांगितली.स्वामींनी त्याला मागे बघावयास सांगितले .ती मूर्ती स्वामींचे मागे येत होते अशा रीतीने मूर्तीमध्ये देखील चैतन्य निर्माण होऊ शकते. एकनिष्ठ भक्ताशिवाय मूर्ती राहू शकत नाही.जसे भक्ताच्या मनामध्ये देवाला भेटण्याची आत्यंतिक इच्छा उत्पन्न होते.व तो देवाला भेटल्याशिवाय राहू शकत नाही तसे देव देखील भक्ताशिवाय राहू शकत नाही.उलट तो एकनिष्ठ भक्ताची वाट पाहतो.भक्ताच्या मनाची स्थिती अशी होते कि,"मी देवाचा व देव माझा"ह्या शिवाय त्याला दुसरे काही सुचत नाही.जेव्हा भक्त देवाला संपूर्णपणे वाहून घेतो तेव्हा देव देखील भक्ताची काळजी वाहतात.त्याचे कामात मदत करतात.
संदर्भ- मूर्ती व चैतन्य (गुरुवाणी पुष्प ४)
|| प.पू श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज कि जय ||
|| श्री गुरुदेव दत्त ||
!! नमस्कार माझा तया रेणुकेला !!
नमो विश्वमाते नमो विश्वकर्ते , नमो विश्वमूले नमो विश्वभर्ते
नमो विश्व निर्मूनिया खेळ केला , नमस्कार माझा तया रेणुकेला....!!
जगन्मोहिनी तू जगन्नाथ माते , जगत्पालके तू जगा अन्नदाते
जगच्चालके पाव या संकटाला , नमस्कार माझा तया रेणुकेला.....!!
भवा दूरकर्ती भवा उत्पन्नीते , भवा पासुनी या भवा सोडवीते
भवा हारुनी वारि या संकटाला , नमस्कार माझा तया रेणुकेला.....!!
मुळी तूच उर्वी मुळाते प्रकाशी , मुळा पासुनी विश्व हे सोडवीसी
मुळी मूळपीठी तू आवास केला , नमस्कार माझा तया रेणुकेला.....!!
अशी नांदसी माय मातापुरी हो , जिची दृष्टि या सर्व सृष्टिवरी हो
जिचा दर्शना दत्त अवधूत आला , नमस्कार माझा तया रेणुकेला....!!
यात्रा भरे कार्तिक शुध्द पक्षी , अंबा उभी राहुनी मार्ग रक्षी
भेटे प्रसन्ना वरदे जगाला , नमस्कार माझा तया रेणुकेला.........!!
आत्मासि शक्ति तुजवीण नाहीं , शक्ति विणा दूजी करणीच नाहीं
वरदान दे सुखी कर आत्म्याला , नमस्कार माझा तया रेणुकेला.....!!
No comments:
Post a Comment