मला वाटे आपण शेंदरी गुलाब व्हावे,
भक्तांनी स्वामी चरणी मजला अर्पावे.
मला वाटे आपण बेल-तुळस व्हावे,
भक्तांनी स्वामी मस्तकी मजला अर्पावे.
मला वाटे आपण हीना अत्तर व्हावे,
भक्तांनी स्वामींना प्रेमाने लावावे.
मला वाटे आपण बेसन लाडू व्हावे,
भक्तांनी स्वामींना नैवेद्यांत अर्पावे.
मला वाटे आपण निरांजन वात व्हावे,
भक्तांनी भक्तीने स्वामीसी ओवाळावे.
पण आता वाटते आपण कापुरच व्हावे
स्वामींच्या कर्पूर आरतीत शून्य होऊनी जावे.
भक्तांनी स्वामी चरणी मजला अर्पावे.
मला वाटे आपण बेल-तुळस व्हावे,
भक्तांनी स्वामी मस्तकी मजला अर्पावे.
मला वाटे आपण हीना अत्तर व्हावे,
भक्तांनी स्वामींना प्रेमाने लावावे.
मला वाटे आपण बेसन लाडू व्हावे,
भक्तांनी स्वामींना नैवेद्यांत अर्पावे.
मला वाटे आपण निरांजन वात व्हावे,
भक्तांनी भक्तीने स्वामीसी ओवाळावे.
पण आता वाटते आपण कापुरच व्हावे
स्वामींच्या कर्पूर आरतीत शून्य होऊनी जावे.
No comments:
Post a Comment